href="http://www.cashmailz.com/pages/index.php?refid=anandan7">cashmailz.com

Thursday, September 30, 2010

जिल्ह्यात परतीच्या पावसाची संततधार भुदरगड तालुक्यात ११५ मि. मी. पावसाची नोंद

कोल्हापूर दि. ३० : कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुदरगड तालुक्यात सर्वाधिक ११५ मि. मी. पाऊस झाला असून त्याखालोखाल गडहिंंग्लज तालुक्यात ८८ मि. मी., राधानगरी तालुक्यात ८५ मि. मी. तर हातक???णंगले तालुक्यात ५९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ५२.९६ मि. मी. पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. तालुक्याच्या नावापुढे गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस दर्शविण्यात आला आहे. कंसात १ जून २०१० पासून झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी दिली आहे. करवीर- २५.५ (७६६.१), कागल- ४६ (६८८), पन्हाळा- ३० (१३८२), शाहुवाडी- ३२ (१८१३), हातकणंगले- ५९(८६५), शिरोळ- ४३ (४५४), राधानगरी- ८५ (२७४१), गगनबावडा- ४८ (५६४०), भुदरगड- ११५ (१४९३), गडहिंग्लज- ८८ (१०४५), आजरा- ५४(१९६१) आणि चंदगड - १०(२३८४). जिल्ह्यात आज एकूण ६३५.५ मि. मी. पाऊस झाला असून आज अखेर एकूण २१२३२.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.